Ajit Pawar
महाराष्ट्र

पूरस्थितीसाठी कारणीभूत ठरलेले अतिक्रमण काढण्याचे अजित पवारांचे आदेश

पुण्यात झालेल्या अतिवृष्टीने इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये महापूर सदृश्य परिस्थिती तयार झाली होती. यामुळे शेतीसह राहत्या घरांचे व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकांच्या घरात पाणी घुसले. गावात पाणी शिरल्याचे मुख्य कारण गावातील ओढ्या नाल्यात झालेले अतिक्रमण असल्याचे लक्षात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. स्थानिकांशी संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अजित पवार सोलापूर दौर्‍यावर जात असताना इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीतील याच अतिक्रमणाने पीडित असलेल्या ओढ्यावर थांबले. हे अतिक्रमण पाहताच ते संतापले दादांनी थेट तिथे उपस्थित असणाऱ्या प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे तसेच तहसीलदार यांना या ओढ्यावरील अतिक्रमण तात्काळ काढण्याचे आदेश दिले. अजित पवार यांच्या आदेशानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले की निमगाव केतकी येथील ओढ्याची हद्द निश्चित करून त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत