Beed : 50-Year-Old Man Assaults Minor Girl, POCSO Case Filed
क्राईम बीड महाराष्ट्र

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील एका गावात 50 वर्षीय नराधमाने 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही पाचवी इयत्तेत शिकत असून गावातीलच एका किराणा दुकानदाराने तिला दुकानात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने दोन महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

पहिल्या घटनेनंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भीतीपोटी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी ही बाब कुणालाही सांगितली नव्हती. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा एकदा आरोपीने मुलीला दुकानात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला.

या प्रकरणाची माहिती समोर येताच गावातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागरिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले.

या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी बालाजी पांचाळ याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत