नवी दिल्ली : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा कसोटी सामना वाचवण्यामध्ये टीम इंडिया यशस्वी ठरली आहे. हा सामना अनिर्णित ठरला आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचा अनुभवी आणि दिग्गज खेळाडू आर. अश्विन याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
आर. अश्विन याने ६ डिसेंबर २०११ ला विंडिजविरूद्ध पदार्पण केले होते. आर. अश्विन याने एकूण २८७ सामने खेळले आहेत. यामधील १०६ कसोटी सामन्यांमध्ये त्याने एकूण ५३७ विकेट घेतल्या आहेत. यामधील ३७ वेळा पाच बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे, तर ८ वेळा त्याने सामन्यात १० किंवा त्याहून अधिक विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. अश्विनने एका डावात ५९ धावांत ७ विकेट आणि एका सामन्यात १४० धावांत १३ विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. त्यासोबतच ११६ वन डे सामन्यांमध्ये त्याने १५६ विकेट्स तर ६५ टी-२० सामन्यात ७२ विकेट्स घेतल्या. अश्विनने ३ हजार ५०३ धावा केल्या असून त्यामध्ये ६ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
RAVI ASHWIN ANNOUNCES HIS RETIREMENT.
– An emotional speech by Ash. 🥹❤️pic.twitter.com/ZkVoKVD0m0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 18, 2024




