The person who sent the obscene audio tape was finally arrested
क्राईम महाराष्ट्र

घृणास्पद! शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत केला विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, शिक्षकावर गुन्हा दाखल

बाळापूर : अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी संध्याळाळी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षक शाळेत मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवायचा.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रमोद सरदार हा शिक्षक म्हणून कार्यरत होता. प्रमोद गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता. विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवित असताना वाईट करायचा तसेच त्यांच्याशी अश्लील गप्पा मारायचा. अखेर मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आले. संतप्त पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत