Pune: A school bus hit a tree in a horrific accident
पुणे महाराष्ट्र

पुणे : स्कूल बस झाडावर आदळून भीषण अपघात, अनेक विद्यार्थी जखमी

पुणे : पुण्यातील वाघोली येथील रायझिंग स्टार या स्कूलची बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस वेगात झाडावर आदळल्याने हा भयंकर अपघात झाला आहे. ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या अपघाताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत. या बसवरती आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत