Chief Minister Eknath Shinde took Last darshan of senior kirtankar Baba Maharaj Satarkar
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पांजली अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबामहाराज यांच्या नेरुळ येथील निवासस्थानी भेट देऊन सातारकर यांची मुलगी, नातू यासह सातारकर कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे जाणे, ही अतिशय दुःखद व मनाला चटका लावणारी घटना आहे. सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मंत्र त्यांनी दिला. आध्यात्मिक प्रचाराबरोबरच समाज प्रबोधनाचे कामही त्यांनी केले. आध्यात्मिक मार्गातून त्यांनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मंत्र दिला. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल होईल, त्यांचे दुःख कमी कसे होईल, हे त्यांनी साध्या सोप्या भाषेत सांगितले. आपल्या अमोघ वाणी व कीर्तनातून त्यांनी राज्याबरोबरच देशविदेशातील नागरिकांना जवळ केले होते.

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत