ISRO successfully launched Aditya L1, Indian Solar Mission From Sriharikota
देश

भारताची सूर्याकडे झेप! इस्रोने केले आदित्य L1 चे यशस्वी लॉन्चिंग

बंगळुरु : चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर आता भारताने सूर्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आदित्य-एल1 यशस्वीरित्या लॉन्च केले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी५७ रॉकेटद्वारे आदित्य-एल१ चं लॉन्चिंग झालं आहे. यासोबतच भारताने एक नवा इतिहास रचला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आदित्य एल-१ प्रक्षेपित करण्यात आले. लाँचिंगच्या १२७ दिवसांनंतर आदित्य एल-१ L1 पॉईंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर तो सूर्याचा अभ्यास करेल आणि सूर्याबाबत महत्त्वाची माहिती पाठवण्यास सुरुवात करेल. आदित्य-L1 ला सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-XL रॉकेटने अवकाशात सोडण्यात आलं आहे.

रॉकेटबद्दल…

  • पीएसएलव्ही रॉकेटचे हे ५९ वे उड्डाण आहे.
  • PSLV-XL या प्रकारातील हे 25 वे उड्डाण आहे.
  • हे रॉकेट 145.62 फूट उंच आहे.
  • प्रक्षेपणाच्या वेळी वजन 321 टन आहे.
  • चार टप्प्यात हे रॉकेट आदित्य-एल१ ला अवकाशात सोडणार आहे.

सूर्याचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. तर, पृथ्वीचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. अंतराळात जिथे या दोघांचे गुरुत्वाकर्षण एकमेकांना भिडते किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जिथे संपतो आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव सुरू होतो. या मधल्या बिंदूला Lagrange Point म्हणतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे पाच लॅरेंज बिंदू चिन्हांकित केले गेले आहेत. भारताचे सूर्ययान लॅरेंज पॉइंट १ म्हणजेच L1 येथे तैनात होईल.

दोन्हीच्या गुरुत्वाकर्षणाची जी सीमा आहे, तिथे एखादी छोटी वस्तू जास्त काळ राहू शकते. ती दोघांच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेली असेल. त्यामुळे अवकाशयानाचे इंधन कमी वापरले जाते. तो बराच वेळ काम करु शकतो. L1 हे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील सरळ रेषेच्या डावीकडे स्थित आहे. हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे. म्हणजे १५ लाख किमी. तर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १५० दशलक्ष किलोमीटर आहे. एकूण पाच लॅरेंज पॉइंट्स आहेत – L1, L2, L3, L4 आणि L5.

आदित्य-L1 अंतराळयान काय करेल?

  • सौर वादळे, सौर लहरी आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम याची कारणे.
  • सूर्यामधून बाहेर पडणाऱ्या उष्णता आणि उष्ण वाऱ्यांचा आदित्य अभ्यास करणार आहे.
  • सौर वाऱ्यांचे विभाजन आणि तापमान यांचा अभ्यास करेल.
  • सौर वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करेल.
  • अवकाशातील हवामान जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत