मुंबई : काही दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल होत आहेत. मात्र, अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, हवामान खात्याने उद्यापासून (23 जून) राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील काही भागांसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. तसेच 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
21 Jun: @RMC_Mumbai & @imdnagpur ने 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ; 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता.
IMD GFS guidance for 23 -25 June indicates same. pic.twitter.com/ZzbS3WRNjI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 21, 2023
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे असणार आहे. पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. अद्याप मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




