मुंबई : हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ४ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. या चक्रीवादळाचा वेग वाढत असून हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जास्त पावसाची शक्यता नाही. मात्र, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून पुढील ५ दिवस खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
6 Jun:Depression over SE Arabian Sea moved nearly northwards intensified in deep depression & at 11.30hrs is at abt 930km W-SW of Goa, 1060km SW of Mumbai, 1150km S-SW & 1450 km south of Karachi.
Likly to move nearly northwards & intensify into
a cyclonic storm in nxt 6 hrs
IMD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2023




