blast in lote midc ratnagiri 10 injured
महाराष्ट्र रत्नागिरी

रत्नागिरीत MIDC मधील कंपनीत स्फोट, ८-९ कामगार गंभीर जखमी

रत्नागिरी : रत्नागिरीच्या खेड येथून मोठी बातमी समोर आली आहे. लोटे एमआयडीसी मधील एका कंपनीत स्फोट झाला आहे. फेब्रिकेशनचे काम चालू असताना सॉलवंट केमिकलने पेट घेतला. या दुर्घटनेत आठ ते नऊ कामगार गंभीररित्या भाजल्याची माहिती समोर आली आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या कामगारांना चिपळूणच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लोटे एमआयडीसीमधील डीवाईन केमिकलमध्ये ही दुर्घटना घडली. या घटनेत ८-9 कामगार होरपळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही संख्या कदाचित वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमी कामगारांना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आशिष मौर्या, संदीपकुमार गुप्ता, विनयकुमार मौर्या, दिलीप दत्ताराम शिंदे हे कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या सगळ्यांवर तातडीने लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान या घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी अद्याप कंपनी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत