Appreciation to 'Sea Cadets' from the Governor
महाराष्ट्र मुंबई

‘सी कॅडेट्स’ना राज्यपालांकडून कौतुकाची थाप

मुंबई : देशभक्ती आणि शिस्त यांचे प्रतीक असलेल्या सी कॅडेट कोअरच्या युवा कॅडेट्सच्या ५० जणांच्या एका चमूने शनिवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यावेळी राज्यपालांनी सी कॅडेट कोअरच्या कार्याची माहिती करून घेतली व कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली. सुरुवातीला सी कॅडेट कोअरचा स्थापनेपासूनच इतिहास सांगणारा माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, सी कॅडेट कोअरचे भीष्म पितामह कमोडोर (एससीसी) रबी आहुजा तसेच सी कॅडेट कोअरचे अधिकारी उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत