MLA Sanjay Shirsat suffered a heart attack
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र मुंबई

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावरून मंगळवारी सकाळी संजय शिरसाट एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती. त्यातच काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना उपचारासाठी मुंबईला लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत