friend tried to kill with a knife
क्राईम महाराष्ट्र मुंबई

‘त्या’ हत्या प्रकरणाचे गूढ उकलले! पती अन् त्याच्या प्रेयसीने दिली होती हत्येची सुपारी

नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर गेल्या गुरुवारी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आलेल्या प्रियांका रावत यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रियांकाचा पती व त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रियांकाच्या पतीसह त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पनवेल तालुक्यातील विहीघर येथे राहणारी प्रियांका रावत ही गेल्या गुरुवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ठाणे येथून लोकलने पनवेल रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर दबा धरून बसलेल्या मारेकऱ्याने गर्दीमध्ये तिच्या गळ्यावर वार केले. खांदेश्वर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. प्रियांकाची हत्या झाल्यानंतर काही वेळातच तिच्या पर्समध्ये असलेल्या मोबाइल फोनवर तिचा पती देवव्रतसिंग रावत (३२) याचा फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळावर बोलावून घेतले होते. त्यामुळे पोलिसांचा पतीवर संशय होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, प्रियांकाचा पती देखतसिंग याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती प्रियांकाला समजली होती. त्यामुळे या दोघांच्या प्रेमसंबधात अडथळा ठरत असल्याने तिचा कायमचा काटा काढण्यासाठी देवव्रतसिंग व त्याच्या प्रेयसीने दोघा मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी देवव्रतसिंग व त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे.

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणाने केली स्वतःच्या आईची हत्या

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत