रत्नागिरी : गुहागरमध्ये दोन बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.
धोपावे – चिपळूण बस आणि गुहागर डेपोची बस एका वळणावर समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी RGPPL च्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.




