छत्तीसगड : छत्तीसगडमधील भिलाई येथील रस्तोगी नर्सिंग कॉलेजमध्ये ६० विद्यार्थिनी अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या सर्व विद्यार्थिनींना नेहरू नगर येथील एका खासगी रुग्णालयात तीन दिवसांपासून दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 46 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे.
रस्तोगी नर्सिंग कॉलेज व्यवस्थापनाने ही बाब आतापर्यंत लपवून ठेवली होती. मात्र, एका विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. 300 विद्यार्थिनी महाविद्यालयात राहून एएनएम आणि नर्सिंगचे शिक्षण घेतात. घटनेची माहिती मिळताच वैशाली नगरचे आमदार विद्यारतन भसीन आणि भिलाईचे महापौर नीरज पाल हेही रुग्णालयात पोहोचले. त्यांनी दुर्ग जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घटनेची माहिती घेतली.
भिलाईचे महापौर नीरज पाल यांनी दुर्ग जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. नीरज पाल यांनी पालिका आयुक्तांना या प्रकरणाची स्वत: चौकशी करून दोषी आढळल्यास व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महापौर नीरज पाल यांनी आजारी विद्यार्थिनींशी चर्चा केली असता त्यांना मेसमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना शिळे जेवण दिले जात होते आणि डाळ पाण्यासारखी असायची. भाजी, भात, रोटी यांचा दर्जा अतिशय खराब होता. केवळ शिळे आणि खराब झालेले अन्न खाल्ल्याने त्यांची प्रकृती बिघडली.
दरम्यान, या घटनेनंतर महापौर पाल यांनी आदेश दिले आहेत कि, भिलाई महापालिका क्षेत्रातील सर्व महाविद्यालये आणि इतर वसतिगृहांची एक एक करून चौकशी करावी. जेवणाचा मेनू आणि तिथे दिले जाणारे अन्न व्यवस्थित तपासले जावे आणि कुठेही कमतरता आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करावी.




