BEER LOADED TRUCK OVERTURNED
देश

बिअर घेऊन जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटला, तीन जण जखमी

हिमाचल प्रदेश : चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्गावर बिअर घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावर उलटला. ट्रक अगोदर दोन कारला धडकला आणि नंतर नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावर उलटला. एवढेच नाही तर धडकेनंतर एक कारही रस्त्यावर उलटली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूर जिल्ह्यात चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रक बिअर घेऊन जात होता. यावेळी समोरून जाणाऱ्या दोन कारला धडकल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. धडकेनंतर दोन्हीही गाड्या रस्त्याच्या कडेला पलटी झाल्या. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर सामुदायिक आरोग्य केंद्र स्वारघाट येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. त्याचवेळी स्वारघाट पोलिस स्टेशनचे पथकही घटनास्थळी पोहोचले.

ही घटना ज्या भागात घडली तो परिसर राम शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येतो. या घटनेची नोंद राम शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. रामशहर पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्वारघाट पोलिस स्टेशनने वाहतूक पूर्ववत केली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक चालकावर बेदरकारपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत