पुणे : भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील ५ दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे, प्रशासनाला कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे जिल्ह्यातील घाट भागात आजपासून 9 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पुढचे ४, ५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता असून कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी अतिमुसळधार पावसासह जोरदार ते अति मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता. ??
? कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचे इशारे.
??कोकणात पूर परिस्थिती अनेक ठिकाणी… https://t.co/kxlIAKcXa7— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आणि जीवित किंवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफच्या पुणेस्थित बटालियनच्या दोन तुकड्याही कोल्हापुरात तैनात आहेत.




