Eknath Shinde Request Mla Shahaji Bapu Patil to say 'Kay Zhadi Kaay Dongar Kay Hotel' Dialogue
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांनी विनंती केली आणि आमदार शहाजीबापू पुन्हा म्हणाले, “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…”

शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…” या वाक्याची सर्वत्र चर्चा आहे. बापूंच्या या डायलॉगने गुवाहाटीमधील आमदारांमध्ये चांगलाच हशा पिकवला. एकनाथ शिंदे यांनीच शहाजीबापूंकडे तो डायलॉग ऐकवण्याची विनंती केली. मग शहाजीबापूंनी देखील “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” हा डायलॉग ऐकवला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्यासोबतचे सर्व आमदार आज हॉटेलच्या लॉबीत आले असता त्यांनी शहाजी बापूंचा डायलॉग ऐकलं आणि त्यांचं कौतुक केलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बापूंकडे हा डायलॉग पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची फर्माईश केली. एकनाथ शिंदे यांनी विनंती केल्यानंतर बापू थोडे लाजले, अगोदर नाही म्हटले, पण उपस्थित आमदारांनी देखील उत्सुकता दाखवल्यावर बापूंनी देखील मग पुन्हा “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल…” हा डायलॉग म्हटला. उपस्थित सगळ्या आमदारांनी बापूंच्या डायलॉगला एकमताने दाद दिली आणि त्यांचं कौतुक केलं. त्यानंतर हा डायलॉग किती व्हायरल झाला आहे आणि त्याची लोकांनी कितीतरी गाणी तयार केली आहेत, हे देखील दाखवलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत