court order
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! साकीनाका बलात्कार – हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

मुंबई : गेल्या वर्षी मुंबईतील साकी नाका येथे टेम्पोमध्ये एका महिलेच्या बलात्कार-हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला मुंबईतील सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबईतील साकीनाका परिसरात गेल्यावर्षी झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मोहन चौहान याने एका महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. पीडित ३४ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्यात आला होता. त्यानंतर पीडितेचा 11 सप्टेंबर रोजी मुंबईतील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर अवघ्या 18 दिवसांत आपला तपास पूर्ण करत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणाच्या सुनावणीत दिंडोशी न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला दोषी ठरवलं.

मुंबईतील दिंडोशी कोर्टात या प्रकरणी सोमवारी युक्तिवाद झाला. कोर्टाने दोषी ठरवल्यावर हे अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचं सांगत राज्य सरकारकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कोर्टात करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाने आज आपला निर्णय दिला आहे. या आरोपीला मुंबईतील सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

मोठी बातमी! साकीनाका घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत