terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore
देश

काश्मीरमध्ये बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या, काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग…

जम्मू-काश्मीर : काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग थांबण्याचे नाव घेत नाहीये, आता काश्मीरमधील कुलगाम भागात एका बँक मॅनेजरवर गोळीबार करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली. त्यानंतर व्यवस्थापकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कुलगाम जिल्ह्यातील अरेह मोहनपोरा येथील इलाकी देहाती बँकेतील बँक व्यवस्थापकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. मॅनेजर विजय कुमार यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. मृत बँक मॅनेजर विजय कुमार राजस्थानमधील हनुमानगड येथील रहिवासी आहे. या घटनेनंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून शोधमोहीम सुरु आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत