two man gang raped his wife in front of husband incident in latur
क्राईम महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! धारावीत 19 वर्षीय विवाहितेवर चाकूचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार

मुंबई : एका 19 वर्षीय विवाहित महिलेवर 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत पहाटे तिच्याच घरात सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील धारावी परिसरात ही घटना घडली. पीडितेने सांगितले की, 2 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत तिला धमकावले आणि तिच्यावर अत्याचार केले. ओळख लपविण्यासाठी आरोपींनी चेहरे झाकलेले होते आणि आरोपींनी या संपूर्ण कृत्याचा व्हिडिओही बनवला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांना आरोपी त्याच भागातील असावेत, असा संशय होता. धारावी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीही तपासले आणि त्यानंतर सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांना अटक केली आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत