Agriculture Minister Dadaji Bhuse inspected the Tissue Culture Lab
पुणे महाराष्ट्र

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली टिश्यू कल्चर लॅबची पाहणी

पुणे : कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज मांजरी येथील केएफ बायोप्लॅन्टस समूहाच्या टिश्यूकल्चर लॅबची पाहणी केली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केएफ बायोप्लॅन्ट समूहाच्या मदतीने काय करता येईल, यासंदर्भातही त्यांनी चर्चा केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भुसे यांनी टिश्यूकल्चर लॅब, उत्पादन केंद्र, ग्रीन हाऊस तसेच डमो हाऊसची पाहणी केली. फुले किती दिवस टिकू शकतात, उत्पादन, फुलांचे विविध प्रकार, निर्यातीबाबत नियोजन, हवामान बदलाचा परिणाम तसेच त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन आदींसह विविध विषयाववर चर्चा झाली. केएफ बायोप्लॅन्टसमूहाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पॉलिहाऊसमधील नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा कृषिमंत्री भुसे यांनी व्यक्त केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी या टिश्यू कल्चर लॅब तसेच बायोप्लॅन्टच्या कार्याची माहिती दिली. 30 देशात रोपांची निर्यात होत असून समूहाच्या ४ प्रयोगशाळा आहेत, दोन प्रयोगशाळांचे कामही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. मांजरी केएफ बायोप्लॅन्ट समूहाच्या पाहणी दौऱ्यावेळी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषकुमार जैन,संचालक किशोर राजहंस, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत