know why sim card is cut off from one side?
गॅझेट्स तंत्रज्ञान

सिम कार्ड एका बाजूने कापलेले का असते? जाणून घ्या…

पुणे : आज आपण मोबाईलवर शिक्षणापासून मनोरंजनापर्यंत अनेक गोष्टी करत असतो. मात्र, या सर्व सेवा वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड असणे आवश्यक आहे. सिमकार्डच्या माध्यमातून तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटही चालू शकते. देशात अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या लोकांची ही गरज पूर्ण करू शकतात. या कारणास्तव, नवीन फोन खरेदी केल्यानंतर, आपण सिम कार्ड देखील खरेदी केले पाहिजे किंवा आपले जुने सिम कार्ड मोबाईल फोनमध्ये ठेवले पाहिजे. पण, तुम्ही या विषयावर कधी विचार केला आहे का की, सिम कार्ड एका कोपऱ्यातून कापलेले का असते?

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चला तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया. सुरुवातीच्या काळात, मोबाइल फोनसाठी जेव्हा सिम कार्ड बनवले, तेव्हा सिमकार्डमध्ये कट डिझाइन नव्हते. या दरम्यान त्याचे डिझायनिंग अगदी सामान्य होते. त्यामुळे अनेकवेळा लोकांना मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकताना आणि काढताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्याचबरोबर त्यांना हे समजण्यातही खूप अडचण यायची की सिम कार्डचा सरळ आणि उलटा भाग कोणता? दूरसंचार कंपन्यांनी नेमका हाच मुद्दा पकडला आणि नंतर सिम कार्डच्या डिझाइनमध्ये काही बदल केले. या कारणास्तव सिम कार्ड कंपन्या एका कोपऱ्यातून सिम कार्ड कापतात. सिमकार्ड कापल्यामुळे मोबाईलमध्ये सिमकार्ड ठेवणे आणि बसविण्याचे काम सोपे झाले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत