beed horrible accident 2 killed 4 seriously injured
क्राईम बीड महाराष्ट्र

बीड भीषण अपघात; भरधाव कारने चौघांना १०० फूट फरफटत नेले, दोघांचा मृत्यू

बीड – कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर रस्त्यावरील दोघे आणि कारमधील दोघे असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री 9:30 च्या दरम्यान बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या घाटनांदूरमध्ये झाला आहे. मिळालेल्या माहितीवरून, रात्री ही कार भरधाव वेगाने अंबाजोगाईकडून घाटनांदूरकडे येत होती. यादरम्यान कारच्या चालकाचे गाडीवरीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या चौघांना धडक दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यावेळी कारने त्या चौघांनाही जवळपास 100 मीटर अंतर फरफटत नेले. यात वैभव सतीश गिरी वय 28 , लहू बबन काटुळे वय 30 हे दोघे जागीच ठार झाले. तर रमेश विठ्ठल फुलारी वय 47, उद्धव निवृत्ती दोडतले वय 50 आणि कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यादरम्यान ग्रामस्थांनी तात्काळ जखमींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले असून सदरील कार एवढी वेगात होती, की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला आहे. दरम्यान दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत