मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मनोरंजन आणि पर्यटनस्थळे तसेच धार्मिक स्थळे ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार
- लग्न सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या सभागृहातील एकूण क्षमतेच्या ५० टक्के इतकी परवानगी देण्यात आली आहे.
- राज्यातील सर्व सरकारी, खासगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीसह सुरू होणार आहेत.
- लशींचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना आंतरराज्यीय प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
- सरकारने ऑफलाइन शाळाही सुरू करण्याची मुभा दिली आहे. शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत आहेत.
- रेल्वे, तसेच बसने प्रवास करताना लसीचे दोन डोस बंधनकारकच करण्यात आले आहेत.
- राज्यातील चित्रपटगृहे , मॉल्स आणि इतर ठिकाणच्या प्रवेशासाठी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारकच आहे.
- मनोरंजन व उद्याने जलतरण तलाव, वॉटर पार्क यांनाही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याच्या परवानगी देण्यात आलेली आहे.
- लग्नसमारंभ तसेच अत्यंसंस्कार विधी अशा कार्यक्रमांवरील निर्बंधही हटवण्यात आले आहेत.
जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचे निकष :
जिल्ह्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ९० टक्क्यांहून अधिक असणे आवश्यक असून, दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक हवी. तसेच करोनाचा पॉझिटिव्हीटीचा दर हा १० टक्क्यांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये सिनेमागृहे , रेस्टॉरंट्स १०० टक्के क्षमतेने सुरू
- मुंबई शहर
- मुंबई उपनगरे
- पुणे
- भंडारा
- सिंधुदुर्ग
- नागपूर
- रायगड
- वर्धा
- रत्नागिरी
- सातारा
- सांगली
- गोंदिया
- चंद्रपूर
- कोल्हापूर




