hair stylist jawed habib spitting on hair
देश

महिलेच्या केसांवर थुंकल्याप्रकरणी जावेद हबीबविरुद्ध FIR दाखल, जावेद हबीबने दिली अजब प्रतिक्रिया…

प्रसिद्ध ब्युटीशियन आणि हेअर डिझायनर जावेद हबीब याच्यावर महिलेच्या केसांवर थुंकल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर पोलिस ठाण्यात पीडित महिला पूजा गुप्ताने जावेद हबीबविरुद्ध कलम ३५५, ५०४ आयपीसी, ३ महामारी कायदा आणि ५६ आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीबने माफी मागितली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

प्रसिद्ध केशभूषाकार जावेद हबीब मुझफ्फरनगरमध्ये आयोजित एका शोमध्ये केस कापताना महिलेच्या केसांवर थुंकला होता. हा केसांवर थुंकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला बागपत येथील बरौत येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला पूजा गुप्ता यांनी सांगितले की, तीन दिवसांपूर्वी जावेद हबीबने हायवेवरील हॉटेल किंग व्हिला येथील एका वर्कशॉपमध्ये प्रात्यक्षिक दिले होते, त्याचवेळी ते केस घाणेरडे असल्याचे सांगून थुंकले. हबीबने केसांवर थुंकून माझा जाहीर अपमान केला आहे, असे या महिलेने म्हटले आहे.

पूजा गुप्ता म्हणाल्या कि, ‘सेमिनारमध्ये प्रश्नोत्तराचे सत्र सुरू होते, जेव्हा मी त्यांना (जावेद हबीब) प्रश्न विचारला, तेव्हा त्यांचे उत्तर होते की तू शांत बस, मी स्टेजवर गेल्यावर त्यांनी सांगितले की ही ती आहे जी सकाळपासून म्हणतेय की हे कसं शक्य आहे? मग त्याने माझे डोके ढकलले, नंतर जेव्हा त्याने माझे केस कापायला सुरुवात केली तेव्हा त्याने माझ्या डोक्यावर दोनदा थुंकले आणि सांगितले की जर तुमच्या पार्लरमध्ये पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही थुंकून केस कापू शकता.’

जावेद हबीब केस कापताना महिलेच्या केसांवर थुंकला, Video व्हायरल

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एसपी सिटी अर्पित विजय वर्गी यांनी सांगितले की, जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये महिलेसोबत गैरवर्तन केल्याची बाब समोर येत आहे, या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. तपासानंतर, आरोपीवर जे काही आरोप आहेत, त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीबने माफी मागितली आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना जावेद हबीबने म्हटले की, मी मनापासून माफी मागतो. तथापि, जावेद हबीबने माफी मागताना थुंकण्याचा काहीही उल्लेख केला नाही. तर त्याऐवजी ‘माझ्या काही शब्दांमुळे दुखावले गेले असाल, त्यासाठी मी माफी मागतो’ असे म्हटले आहे. तसेच आमचे शो प्रोफेशनल असतात आणि जास्त वेळ सुरु असतात, त्यामुळे त्यात थोडा विनोदाचा भाग टाकावा म्हणून हे सर्व करावं लागतं, असं अजब वक्तव्य देखील जावेद हबीबने केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jawed Habib (@jh_hairexpert)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत