मुंबई : राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये सातारा, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील डोंगराळ भागात पावसाची शक्यता अधिक आहे. नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
4 Oct, 2021: राज्यात पुढच्या 4,5 दिवसात काही ठिकाणी गडगडाटासहीत??? जोरदार पावसाची शक्यता.
अधिक माहितीसाठी @RMC_Mumbai @RMC_Nagpur वेब साईट प्लीज़ पहा pic.twitter.com/J22hULBkxl— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 4, 2021




