Bangladesh flight made a medical emergency landing at Nagpur airport
नागपूर महाराष्ट्र

पायलटला विमानातच सुरू झाला हृदयविकाराचा त्रास, मग…

नागपूर : पायलटला विमानातच हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याने बांगलादेशच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले. या विमानात एकूण १२६ प्रवासी होते. मस्कतहून ढाक्याला जाणारे हे विमान रायपूरवरुन जात असताना पायलटला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला, त्यामुळे विमानाने कोलकाता एटीसीला संपर्क करून विमानातील परिस्थितीबद्दल सांगितले. त्यानंतर एटीसीने विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्याचे आदेश दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या पायलटला हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने सकाळी ११.४० वाजताच्या सुमारास विमान तातडीने नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. पायलटला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. एअरलाइन्सने पर्यायी विमानाची व्यवस्था केल्यानंतर हे प्रवासी येथून रवाना होतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत