मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. जुहू येथील एका आलिशान हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी छापा टाकण्यात आला होता. यावेळी पोलिसांच्या गुन्हे शाखेने 32 वर्षीय मॉडेलला अटक केली आहे. गुन्हे शाखेने सांगितले की ही मॉडेल सेक्स रॅकेट चालवत होती. यात टीव्ही कलाकार आणि मॉडेल देखील सामील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान एक टीव्ही अभिनेत्री आणि एक मॉडेलला तेथून बाहेर काढण्यात आले. या टीव्ही अभिनेत्रीने एका सुप्रसिद्ध चॅनेलसह मालिकांमध्ये काम केले असून मॉडेलने अनेक जाहिरातीमध्ये काम केले आहे. गुन्हे शाखेला याबाबत एक टीप मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला होता. या ग्राहकाला काही तरुणींचे फोटो पाठवण्यात आले होते. त्यानंतर आरोपी महिलेने या दोघींसाठी 4 लाख रुपयांचा सौदा केला होता.
आरोपी मॉडेलने बनावट ग्राहकाला जुहूच्या एका थ्री स्टार हॉटेलमध्ये येण्यास सांगितले होते. ही मॉडेल दोन महिलांसोबत तेथे येताच पोलिसांनी तिला पकडले. आरोपी मॉडेलवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून सांताक्रूझ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, या मॉडेल आणि टीवी अभिनेत्रीने सांगितले की, लॉकडाऊनमुळे जाहिराती आणि टीव्ही मालिकांचं शूटिंग बंद झाल्यानंतर त्या या व्यवसायत आल्या.




