Relaxation In Corona Restrictions In Pune Big Relief For Hotels Malls And Shops
पुणे महाराष्ट्र

पुणेकरांना मोठा दिलासा! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना निर्बंधात शिथिलता

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील निर्बंधात शिथिलता देण्याबाबत घोषणा केली आहे. बैठकीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार रात्री सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असून पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

परंतु, पुण्याचा पॉझिटीव्हीटीचा दर जर ७ टक्क्यांहून अधिक झाला, तर पुन्हा निर्बंध लागू करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पुणेकरांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे. सर्व नियम पाळलेच पाहिजे. नियमांमध्ये शिथिलता हवी असेल तर खबरदारी घेतली पाहिजे ही मी नम्र विनंती करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

ग्रामिण भागात १३ तालुक्यांमध्ये लेवल ३ ची नियमावली सोमवारपासून लागू करण्यात आली आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराप्रमाणे ग्रामीणलाही सूट द्या अशी मागणी होती. मात्र पॉझिटीव्हीटीचा दर सरासरी ५ असल्याने तसा निर्णय घेता येत नसल्याचे ते म्हणाले. तसेच, राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये देखील मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंदच राहतील, असे अजित पवार म्हणाले.

  1. पुण्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील.
  2. पुण्यातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  3. हॉटेल चालकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असेल.
  4. पु्णे आणि पिंपरी चिंचवडमधील मॉल्स रात्री ८ पर्यंत सुरू राहणार. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश.
  5. उद्याने सुरू राहणार.
  6. जलतरण तलाव वगळता इतर सर्व खेळांना परवानगी.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत