Youth Akali Dal Leader Vicky Middukhera Shot Dead In Mohali
क्राईम देश

ब्रेकिंग : युवा अकाली दलाचे नेते विक्रमजीत सिंह मिडदुखेरा यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

मोहाली : युवा अकाली दलाचे नेते विक्रमजीत सिंह मिडदुखेरा उर्फ विक्की मिडदुखेरा यांची शनिवारी सकाळी मोहालीच्या सेक्टर 71 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विकी मिडदुखेरा यांच्यावर मोहाली येथे अज्ञात सशस्त्र लोकांनी गोळीबार केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी सांगितले की, विक्की मिडदुखेरा सकाळी 10.30 च्या सुमारास सेक्टर 71 मधील मातौर मार्केटमधील एका प्रॉपर्टी डीलरच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी चारपैकी दोन मुखवटाधारी लोकांनी मिडदुखेरा यांचा पाठलाग केला. प्रॉपर्टी डीलरच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर विक्की मिडदुखेरा त्यांच्या कारमध्ये बसत असतानाच दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. दोन मारेकऱ्यांनी सुमारे 20 राउंड फायर केले, यावेळी इतर दोघे त्यांच्या गाडीत बसून राहिले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मिडदुखेरा यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावरून गोळ्यांचे रिकामे शेल सापडले आहेत. तसेच तपास पथक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात आहे. दोषींचा शोध घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.

शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) प्रवक्ते दलजीत सिंह चीमा यांनी सांगितले की, युवक संघटनेच्या नेत्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा भाऊ अजयने मोहालीचे माजी महापौर कुलवंत सिंह यांच्या मुलाच्या विरोधात स्थानिक महापालिका निवडणूक लढवली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत