Porn video started by miscreants students during online class
महाराष्ट्र मुंबई

ऑनलाइन वर्ग सुरु असताना काही विद्यार्थ्यांनी सुरु केला पॉर्न व्हिडिओ…

मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या शाळा व महाविद्यालये ऑनलाइन माध्यमातून सुरू आहेत. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरु असताना घडणाऱ्या अनेक विचित्र घटना समोर येत असतात. मुंबईतील विलेपार्ले येथील एका महाविद्यालयाचा ऑनलाइन वर्ग सुरू असताना अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. काही टवाळखोर विद्यार्थ्यांनी चालु वर्गात पॉर्न व्हिडिओ अपलोड केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चार दिवसांपूर्वी घडली आहे. त्यानंतर संबंधित प्राध्यपकांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार हा प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात आयपीसी २९२, ५७० आणि सायबर गुन्ह्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार जुहू पोलिस पुढील तपास करत असून दोषींवर लवकरच योग्य ती कारवाई होईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत