A Ship sunk In The Sea Near The 'Heera Oil Fields; More Than 130 Still Missing
महाराष्ट्र मुंबई

पी-३०५ बार्जचे कॅप्टन राकेश बल्लव यांचा मृत्यू झाल्याचे उघड, रुग्णालयातील बेवारस मृतदेह त्यांचाच..

मुंबई : मुंबई हाय येथे बुडालेल्या बार्ज P ३०५ चे कॅप्टन राकेश बल्लव या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे अखेर डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. जेजे रुग्णालयात ओळख न पटलेल्या बेवारस मृतदेहाचा डीएनए बल्लव यांच्या मुलाशी जुळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बल्लव कुटुंब काही दिवसांपूर्वी जेजे रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आले होते. तेव्हा एक मृतदेह बल्लव यांचा असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. परंतु, त्यांनी खात्रीने सांगता येणार नाही, असं सांगितल्यामुळे पोलिसांनी निव्वळ अंदाजावर मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, डीएनए चाचणीसाठी त्यांच्या मुलाचा नमुना घेत तो चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. त्यावरून तो डीएनए बल्लव यांच्याशी जुळल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत