why facebook changed its name meta
ग्लोबल तंत्रज्ञान

फेसबुकने नाव का बदलले? त्याचा युजर्सवर काय परिणाम होईल? जाणून घ्या…

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ केले आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली. मात्र, आता हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की कंपनीचे नाव का बदलण्यात आले? चला तर त्याबद्दल जाणून घेऊया..

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वास्तविक मार्क झुकरबर्ग यांची इच्छा आहे की आपली कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनी म्हणून ओळखली जाऊ नये. कंपनी सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन मेटाव्हर्स वर्ल्डची तयारी करत आहे. यासाठी कंपनी 10 हजार लोकांना कामावर घेणार आहे. जे कंपनीला मेटाव्हर्स (Metaverse) बनवण्यात मदत करतील. मेटाव्हर्सला आभासी वास्तव (virtual reality) समजता येईल. म्हणजेच इथे लोकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीची असेल. लोक एकमेकांना डिजिटल पद्धतीने भेटू शकतील. केवळ फेसबुकच नाही तर मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्या देखील Metaverse मध्ये गुंतवणूक करत आहेत. झुकरबर्ग बर्‍याच काळापासून व्हर्च्युअल रियॅलिटी आणि ऑगमेंटेड रियॅलिटीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे.

एकूणच Metaverse च्या दुनियेत पुढे जाण्यासाठी फेसबुकने आपले नाव बदलून Meta असे केले आहे. यापुढे लोकांनी फेसबुक कंपनीला केवळ सोशल मीडिया कंपनी म्हणून ओळखू नये यासाठी कंपनीचा हा प्रयत्न आहे. आता नाव बदलल्यानंतर लवकरच कंपनीकडून अनेक मोठ्या घोषणाही समोर येऊ शकतात.

जे नाव बदलले आहे ते मूळ कंपनीचे नाव आहे. म्हणजेच कंपनी म्हणून फेसबुकचे नाव बदलून मेटा करण्यात आले आहे. कंपनीचे बाकीचे प्लॅटफॉर्म Facebook, Instagram आणि WhatsApp या नावांनीच ओळखले जातील. म्हणजेच नाव बदलल्याने त्याचा थेट परिणाम युजर्सवर होणार नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत