पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळमधील हर्षदाने ग्रीस- हेरॅक्लिओन येथील स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. हर्षदा शरद गरुड हिने ग्रीसमधील हेरॅक्लिओन येथे IWF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनण्याचा इतिहास रचला. […]

