नागपूर : महाराष्ट्राच्या इतिहासातील शिवकालीन इतिहास हा प्रत्येकाच्या मनात शौर्याची भावना निर्माण करणारा आहे. राज्यातील गड किल्ले व शिवशस्त्र हे या शौर्याच्या इतिहासाचे दीपस्तंभ म्हणून आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. या शौर्याच्या गाथेतील प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या मनामनात जपलेली शिवरायांची वाघनखे व शिवकालीन शस्त्र पाहण्याची अपूर्व संधी विदर्भवासियांना नागपूर येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिवकालीन शस्त्र […]

