मुंबई : महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात एकूण ३३,००२ अपघात झाले असून, त्यामध्ये १४,०६६ अपघाती मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ३२,७८४ अपघातांत १४,१८५ […]
टॅग: वाहतूक नियम
पुणे : डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, डंपरचालक मोबाईलवर व्यस्त आणि…
पुणे : रविवारी सकाळी देहू रोड परिसरात झालेल्या अपघातात ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव दीपल बहादूर साई असून तो विकास नगर येथे राहात होता आणि खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. हा अपघात किवळे येथील साई द्वारका हाऊसिंग सोसायटीजवळ सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. दीपल बहादूर आपल्या दुचाकीवरून जात असताना डंपरने त्याला जोरदार […]
जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५
मुंबई : शासनाने १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे बंधनकारक केले आहे. याअंतर्गत अशा वाहनांना यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी […]
वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचा वाहन परवाना निलंबित करावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची कार्यवाही केली जाते. मात्र ज्या वाहनचालकांवर पाच ते सहा वेळा दंडाची कारवाई झाली आहे त्यांचा वाहन परवाना काही दिवस, महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले. द्रुतगती महामार्गावर वेगाने मार्गिका बदलणाऱ्या (लेन जंप) वाहनचालकांवर कारवाईसाठी पथक नेमावे. या पथकाच्या माध्यमातून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर नजर […]



