Veterinarians should be treated as per improved recommendations for lumpy - Animal Husbandry Commissioner Sachindra Pratap Singh
महाराष्ट्र मुंबई

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात 3091 पशुपालकांच्या खात्यावर 8.05 कोटी रुपये जमा

मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 3091 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी रु. 8.05 कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सिंह म्हणाले, राज्यामध्ये 31 ऑक्टोबर २०२२ अखेर 33 जिल्ह्यांमधील एकूण 3204 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 172528 बाधित […]

Veterinarians should be treated as per improved recommendations for lumpy - Animal Husbandry Commissioner Sachindra Pratap Singh
महाराष्ट्र

बहुतांश जिल्ह्यांत लम्पीबाधित जनावरांच्या संख्येत घट – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

मुंबई : राज्यात गेल्या 3 -4 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत लम्पी आजाराच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये लम्पी आजाराचा राज्यातील सद्यस्थितीबाबत विस्तृत आढावा घेण्यात आला. सिंह म्हणाले की, गत आठवडाभरातील पाऊस व त्यामुळे निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे […]

Veterinarians should be treated as per improved recommendations for lumpy - Animal Husbandry Commissioner Sachindra Pratap Singh
महाराष्ट्र

लम्पी आजारासाठी पशुवैद्यकांनी सुधारित शिफारशींनुसार उपचार करावेत – पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह

मुंबई : शासनाने खाजगी पशुवैद्यकांना लम्पी चर्मरोग आजाराच्या उपचारासाठी कोणतीही बंदी घातलेली नाही. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने 5 ऑक्टोबर, 2022 रोजी दिलेल्या सुधारित शिफारशीनुसार उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी […]

PM Modi said - Scientists have prepared indigenous vaccine against lumpy disease in animals
महाराष्ट्र

राज्यातील लम्पी बाधितांपैकी 50 टक्के पशुधन रोगमुक्त

मुंबई : राज्यामध्ये दि. 3 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील 2151 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील 48,954 बाधित पशुधनापैकी 24,797 म्हणजे सुमारे 50 टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सिंह यांनी सांगितले की, राज्यातील बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर 109.31 लाख लस […]

PM Modi said - Scientists have prepared indigenous vaccine against lumpy disease in animals
महाराष्ट्र

राज्यातील लम्पीबाधित 4600 जनावरे रोगमुक्त, शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन

मुंबई : राज्यामध्ये 21 सप्टेंबर 2022 अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली, रायगड व नंदुरबार अशा 28 जिल्ह्यांमधील एकूण 1 हजार 406 गावांमध्ये फक्त 13 हजार 425 जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित […]

Aadhaar information will be collected from existing voters in Mumbai suburban district from August 1
महाराष्ट्र मुंबई

आरे दुग्ध वसाहत प्रक्षेत्रातील लम्पी त्वचारोग संसर्ग ठिकाणापासून 10 किमीपर्यंत बाधित क्षेत्र म्हणून घोषित

मुंबई : मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे आरे दुग्ध वसाहत येथील प्रक्षेत्रातील जनावरांमध्ये लम्पी त्वचारोग या साथ रोगाचा निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्याने पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रक्षेत्र या संसर्ग केंद्रापासून (Epicentre) १० किलोमीटरपर्यंत बाधित क्षेत्र (Infected zone) म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. श्रीमती चौधरी म्हणाल्या, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे आरे दुग्ध […]

PM Modi said - Scientists have prepared indigenous vaccine against lumpy disease in animals
महाराष्ट्र

लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्या सरसकट लसीकरणास शासनाची मान्यता

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांत लम्पी प्रतिबंधासाठी ४९.८३ लाख लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी. परिघातील १२२९ गावातील १९.५५ लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात आले असून व गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने जनावरे असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात सरसकट लसीकरण करण्यासाठी […]

PM Modi said - Scientists have prepared indigenous vaccine against lumpy disease in animals
महाराष्ट्र

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव : राज्यातील 22 जिल्ह्यातील बाधित गाव परिसरात सात लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण

मुंबई : राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये १४ सप्टेंबर २०२२ अखेर एकूण ४७० गावांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. लंपी नियंत्रणासाठी राज्यातील 22 जिल्ह्यातील बाधित गावांच्या परिसरातील 2 हजार 535 गावांमध्ये 7 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले, जळगाव २४, अहमदनगर १७, धुळे १, अकोला ५, पुणे […]

PM Modi said - Scientists have prepared indigenous vaccine against lumpy disease in animals
महाराष्ट्र

लम्पी आजाराचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही – सचिन्द्र प्रताप सिंह

मुंबई : लम्पी चर्म रोग नियंत्रणासाठी १० लक्ष लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नसल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले. पशुसंवर्धन आयुक्त सिंह यांनी सर्व पशुपालकांना शासनाच्या वतीने आवाहन […]