मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांना गेल्या आठवड्याच्या शेवटी छातीत दुखू लागल्यानंतर मुंबईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात अनुराग कश्यप यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना लवकरात लवकर डॉक्टरकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते. […]

