Health Minister Prof. Dr. Tanaji Sawant
महाराष्ट्र मुंबई

बक्करवाडी येथे अवैध गर्भपातामुळे झालेल्या मृत्यूची विशेष पथकामार्फत होणार चौकशी

मुंबई : बीड जिल्ह्यातील बक्करवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपातामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य लक्ष्मण पवार, डॉ भारती लव्हेकर, नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. बक्करवाडी प्रकरणात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]