Fire engulfs Taloja MIDC, spreads to surrounding companies
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : तळोजा एमआयडीसीत आगीने घेतलं रौद्ररूप, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये पसरली आग

मुंबई : नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागली आहे. ह्या आगीची भीषणता वाढली असून बाजूच्या दोन कंपन्यादेखील या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. आग रौद्ररूप घेत असून परिसरात घबराट पसरली आहे. सध्या अग्निशमन दलाची टीम आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत फार्मा कंपन्यांना लागणारं सॉल्व्हन्ट ऑइल तयार होत असल्याची माहिती आहे. […]