पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात कार्व्हर एव्हिएशनचे विमान एका शेतात कोसळले. आज सकाळी 11.30 च्या सुमारास प्रशिक्षणार्थी विमान शेतात कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात 22 वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलट भाविका राठोड जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात पायलट भाविका राठोड किरकोळ जखमी झाल्या आहेत. बारामतीत कार्व्हर एव्हिएशनच्या माध्यमातून वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. […]

