मुंबई : राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेले टार्गेट बंगळुरुच्या सलामी जोडीने सहज पार केले. या सामन्यातील दिमाखदार विजयासह बंगळुरुने सलग चौथा विजय नोंदवत धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला गुणतालिकेत जोरदार धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. गुणतालिकेत आठ गुण कमावणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या राजस्थानने निर्धारित 20 षटकात 9 बाद 177 धावा केल्या होत्या. […]

