मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ठाकरे हे राऊत यांच्या भांडुप उपनगरातील निवासस्थानी गाडीतून गेले. राऊत आणि ठाकरे यांचे जवळचे नाते आहे. संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने कथित पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. मुंबईतील चाळीच्या पुनर्विकासात झालेल्या अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात तपास यंत्रणा […]

