मुंबई : शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी सवलतीत मुद्रांक शुल्क नाममात्र १००० रुपये व नोंदणी फी १०० रुपये आकारण्यात येईल. शेतजमिनीच्या ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात. ते मिटविण्यासाठी व समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा […]

