The need to raise voice to solve the problems of Marathwada, the emerging youth expressed hope
महाराष्ट्र

मराठवाड्याच्या समस्या सोडविण्यासाठी आवाज बुलंद करण्याची गरज, उदयोन्मुख तरुणाईने व्यक्त केली अपेक्षा

पुणे : मराठवाड्याचा भौगोलिक नकाशा संघर्षच दर्शवितो. संघर्षपूर्ण जीवनातून मराठवाड्यातील प्रत्येक व्यक्तीने विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. मराठवाडा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असला तरी मराठवाड्याचा संघर्ष अद्याप संपलेला नाही. मराठवाड्याच्या ज्या-ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रत्येकाने आवाज बुलंद केला पाहिजे, अशी अपेक्षा मराठवाड्यातील तरुणाईने व्यक्त केली. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव समारोह समिती आणि वृंदावन फाउंडेशन यांच्या […]