अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. त्या इतिहासाची १ जून २०२२ रोजी अहमदनगर-पुणे दरम्यान पुनरावृत्ती झाली. अहमदनगर-पुणे दरम्यान ‘शिवाई’ या राज्यातील पहिल्या विद्युत घटावरील (ई-बस) सेवेची सुरूवात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले वाहक अहमदनगर येथील लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. एसटी […]

