मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मुल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने जाहीर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री […]

