उत्तर प्रदेश : एका तरुणाने आपल्या बहिणीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आले आहे. मेरठ जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाची बहिण तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती, त्यामुळे तो खूप चिडलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील सरधना भागातील छूर गावात राहणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीचे गौरव नावाच्या एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. […]

