महाराष्ट्र मुंबई

आरोग्य विभागाअंतर्गत बदल्या, पदोन्नतीसाठी ‘एसएचएसआरसी’चे मूल्यांकन प्रमाण मानण्याच्या सूचना

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचएसआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. या संदर्भात परिषद सभागृह, मंत्रालय येथे नवीन तांत्रिक कोर्सेस, नवीन प्रशिक्षणांचे नियोजन, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आणि तांत्रिक कर्मचारी […]

Nandurbar Model for Sickle Cell and Malnutrition Elimination Launched by Health Minister
महाराष्ट्र मुंबई

‘सिकलसेल’ निर्मूलनाचे नंदुरबार मॉडेल विकसित करावे – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल, थॅलेसेमिया, ॲनेमिया व लहान बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हाभर प्रभावीपणे तपासणी व उपचार मोहीम राबवून राज्यात सिकलसेल निर्मूलनाचे नंदुरबार मॉडेल विकसित करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्यसेवा आयुक्तालय येथे आयोजित बैठकीत दिले. राज्यातील नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर व नाशिकसारख्या आदिवासीबहुल व दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्याचा […]